खिडकी उघडी असताना आणि दरवाजाला छिद्र करुन आपल्या मोबाइल फोनमधून महिलांचे व्हिडिओ शूट करत होते

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मोबाइल फोनवरुन महिलांचे न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ शूट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.पोलिसांना संशय आहे की, या प्रकरणात इतरही आरोपींचा समावेश आहे. सतीश धनवेद हरिजन, सर्वनन तंगराज हरिजन आणि स्टिफन राज मुर्गेश नाडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास करताना संशय व्यक्त केला आहे की, आरोपी हे आपल्या मोबाइल फोनच्या सहाय्याने बाथरूमच्या खिडकीच्या गॅपमधून किंवा दरवाजाला छिद्र पाडून व्हिडिओ शूट करत होते. या प्रकरणात पोलिसांनी मोबाइल फोन, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे

पोलिसांनी सांगितले की, खिडकी उघडी असताना आणि दरवाजाला छिद्र करुन आरोपी आपल्या मोबाइल फोनमधून महिलांचे व्हिडिओ शूट करत होते. तर काही महिलांचे फोटो सुद्धा काढले. काहींच्या खिडकी किंवा दरवाजाला फट पडलेली असते त्याचा फायदा आरोपींनी घेत महिलांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते. इतकेच नाही तर या महिलांचे अनेकदा कपडे बदलतानाचेही व्हिडिओ शूट केले होते.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत तीन ते चार पीडित महिला समोर आल्या असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. महिलांनी पुढाकार घेत आरोपींच्या विरोधात जबाब दिल्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी आयटी act सह कलम 354सी, 292 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.