भरधाव आयशरची कारला धडक, चालकाचा म्रत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जालना : भरधाव आयशरने कारला धडक दिल्याची घटना जालना तालुक्यातील धारकल्याण पाटीजवळ घडली.

यात कृष्णा ज्ञानेश्वर कळकुंबे (२४ रा. जळगाव, ता. जि.जालना) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

कृष्णा हा मामाच्या गावाला गेला होता. तो बुधवारी सकाळी नाव्हा येथून जालन्याकडे कारने येत होता. धारकल्याण पाटीजवळ आल्यावर जालन्याकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने कारला जोराची धडक दिली. यात कृष्णा गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाला होता. ग्रामस्थाने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीट अंमलदार रामेश्वर काकड यांनी दिली. दरम्यान, कृष्णाने महिन्याभरापूर्वीच कार खरेदी केली होती, अशी माहिती मिळाली