क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

भाजपा नेत्या सीमा पात्रा यांनी रॉडने मारहाण करुन पीडितेचे दात तोडले,8वर्षे केला छळ


आरोपी सीमा यांचे पती महेश्वर पात्रा हे राज्याच्या आपतकालीन विभागात सचिव पदावर होते. विकास आयुक्त या पदावरुन ते निवृत्त झाले. त्यांची पत्नी सीमा भाजपा नेता होती. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानात प्रदेश संयोजिकेची जबाबदारी दिली होती.



रांची : 29 वर्षांच्या एका आदिवासी दिव्यांग महिलेसोबत केलेला छळ नुसता ऐकला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एक-दोन नव्हे तर आठ वर्षे हा छळ करण्यात आला.
एका निवृत्त IAS अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजपा नेत्या ( Retired IAS officer wife and BJP leader)सीमा पात्रा यांनी हा अनन्वित छळ केला आहे. या पीडित मुलीचे नाव आहे सीमा. तीने सांगितलेला छळ ऐकतासुद्धा येणार नाही इतका भयावह आहे. तिला पोटभर जेवण तर नशिबात नव्हतेच. तिला रॉडने मारहाण करण्यात येत असे. इतकंच नाही तर तिला गरम तव्याने चटकेही दिले जात. तिची सुटका केल्यानंतर तिला रांचीच्या रिम्समध्ये भरती करण्यात आले आहे.

या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की तिची मालकीण इतकी क्रूर होती की तिने रॉडने मारहाण करुन पीडितेचे दात तोडले. तिला केलेल्या मारहाणीने तिला चालता येणे अशक्य झाले होते. तिला जमिनीवर सरपटून चालावे लागे. अशा स्थितीत जर कधी चुकून तिची लघवी तिच्या खोलीबारे गेली, तर मालकीम ती जमीन तिला जिभेने साफ करायला लावी. सुनीताने सांगितले की तिने गेले अनेक वर्ष सूर्यदर्शनच घएतले नव्हते. हे वृत्त समोर आल्यानंतर आता सीमा यांना भाजपातून काढून टाकण्यात आले आहे.

हे नराधम पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी मानल्या जाणाऱ्या अशोक नगर परिसरात राहतात. सीमा पात्रा यांचा दोन मुले आहेत. ही पीडित महिला गुमलाची राहणारी होती. मुलीचा दिल्लीत नोकरी मिळाल्यानंतर 10 वर्षांपूर्वी ती दिल्लीत गेली. 6 वर्षांपूर्वी ती रांचीत परतली. तेव्हापासून तिचा अनन्वित छळ करण्यात येतो आहे. तीला काम सोडायचे होते, पण 8 वर्षे तिला घरात बंदीवासात ठेवण्यात आले. घरी जाण्याचे तिने नाव काढले की तिला जबर मारहाण करण्यात येत असे. आजारी असताना तिच्यावर कधी उपचारही करण्यात आले नाहीत.

पीडित सुनिताने एके दिवशी एका मोबाईलवरुन सरकारी कर्मचारी ववेक बास्के यांना मेसेज पाठवला आणि तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणात अरगोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांनतर रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमने तिची सुटका केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button