शहीद भगतसिंग सैनिक भरती ट्रेनिंग शाळेची सुरुवात

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


 

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिल्लीतील विद्यार्थ्यांना आणखी एक भेट दिली आहे.

येथे शहीद भगतसिंग सैनिक भरती ट्रेनिंग शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेत ९ वी आणि ११ वी शाळेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. विशेष म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असून सैन्य दलात भरती होण्यासाठीचं संपूर्ण प्रशिक्षण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही शाळा महत्वपूर्ण आणि दर्जात्मक असल्याचं म्हटलं आहे.

शहीद भगत सिंह आर्म्ड फोर्सेज प्रिपरेटरी स्कूल नावाने ही शाळा सुरु झाली असून येथे एनडीएमधील निवृत्त अधिकारी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. नेव्ही, एअरफोर्समध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळणार आहे. ही निवासी शाळा असून विद्यार्थ्यांना येथेच राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना येथे कुठलीही कमतरता जाणवणार नसून अभ्यासवर्गही चालवले जाणार आहेत.