नववधूचे तिच्या मेव्हण्याशी प्रेमसंबंध,शारिरिक संबंधांचा व्हिडीओ होणाऱ्या पतीने ऐन विवाह सोहळ्यात स्क्रीनवर लावला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


विवाह सोहळा म्हणजे पती-पत्नी नात्याच्या मधुर मिलनाचा आनंददायी प्रसंग होय. त्याचप्रमाणे वधू आणि वर या दोन्ही कडील मंडळाचा देखील स्नेह मिलन सोहळा म्हणता येईल.
याप्रसंगी सर्व काही मंगल घडावे असे अनेकांना वाटते. परंतु काही लग्नात विनाकारण विघ्न येते, याची कारणे वेगवेगळ्या असतात. पती-पत्नीचे नाते हे प्रेम विश्वासाने जिव्हाळा यावर अवलंबून असते. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील ही नाते अशाच प्रकारे टिकून राहावे असे सर्वांना वाटते, परंतु काही वेळा दोघांमध्ये तिसरा येतो आणि या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सध्या सोशल मिडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चीनमध्ये एका नववधूचे तिसऱ्याच एका व्यक्तीबरोबर संबंध असल्याची होणाऱ्या नवर्‍याला लागली आणि त्याने त्या संदर्भात माहिती गोळा करून एक व्हिडिओ देखील मिळविला आणि तो स्वतःच्याच लग्नात सर्व वऱ्हाडी मंडळीसमोर सादर केला, मग काय विचारता. लग्नात विघ्न निर्माण झाले आणि हे लग्न तिथेच मोडले, त्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

विवाह सोहळ्यांसारख्या मोठ्या प्रसंगांत लहान मोठे वादविवाद होत असतात, त्यांच्यावर सहजनेते मातही केली जाते, समजुती, विनवण्या केल्या जातात. मात्र जर कुणाच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तर मात्र प्रकरण गंभीर मानायला हवे. चीनमध्ये असाच एक विवाह सोहळा सुरु झाल्यानंतर काही तास चालला आणि एका मोठ्या वादानंतर तिथेच संपला. विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांसमोर होणाऱ्या पतीने, आपल्या होणाऱ्या नववधूच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाचा भांडाफोड केला. या लग्नाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

विवाह सोहळ्यात, पाहुण्यांसमोर असलेल्या मोठ्या स्क्रीनवर नववधूचा एक व्हिडीओ पतीने लावला. यामुळे त्या लग्न पार्टीत सर्वत्र खळबळ उडाली. कारण या नववधूचे तिच्या मेव्हण्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्या शारिरिक संबंधांचा व्हिडीओच होणाऱ्या पतीने ऐन विवाह सोहळ्यात स्क्रीनवर लावला. तसेच शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की- पतीने सगळ्यांसमोर आपल्या पत्नीचा व्हिडीओ प्ले केला, ही वधू त्याची फसवणूक करीत होती आणि तिचे लफडे तिच्या गर्भवती बहिणीच्या नवऱ्याशी सुरु होते.

हा सगळा प्रकार व्हिडिओतून उघड झाल्यानंतर लग्न समारंभातील पाहुणेही चांगलेच हैराण झाले, तो व्हिडिओ पाहून मनातून घाबरलेही. हा व्हिडिओ पाहिल्यावर नववधूने वेडिंग बुके तिच्या होणाऱ्या पतीच्या दिशेने फेकला. त्यावेळी पतीने ओरडून विचारले, तुला काय वाटतं होतं, मला हे माहित नसेल?, हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकत्याच शेअर करण्यात आलेली ही व्हिडीओ क्लिप एक कोटींहून अधिक जणांनी पाहिले आहे. यावर युझर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हेच करायचे होते तर लग्नावर एवढा पैसा खर्च का केला, असा सवालही विचारण्यात आला आहे. हे कपल दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अशीही माहिती आहे.