बीड अल्पवयीन नातीवर आजोबाचा अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत चुलत आजोबानेच आपल्या अल्पवयीन (वय १० वर्षे) नातीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. तुकाराम मेघा राठोड (वय ५३) असे आरोपीचे नाव आहे. आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन नातीवर या नराधमाने घरात शिरत जबरदस्तीने अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर मुलगी रडतं बसल्याचे लक्षात आले असता, तिने विचारल्यावर घडलेला सर्व प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला.

दरम्यान, पीडितेच्या आईने नातेवाईकांसह दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठले. आईच्या तक्रारीवरून आरोपी तुकाराम राठोड याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करत असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.