महाराष्ट्र,जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आज पहाटे 3 वाजून 28 मिनिटांनी जम्मू-काश्मीरमधील कटरापासून 62 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. गेल्या तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही सातवी वेळ आहे.

यासोबतच आज पहाटे 2 वाजून 21 मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून 171 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.

गुरुवारी, एनसीएसने सांगितलं होतं की कोल्हापुरात सकाळी 12 वाजताच्या सुमारास 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती. याशिवाय आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास काबुल, अफगाणिस्तानपासून 164 किमी अंतरावर 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची खोली जमिनीच्या खाली 80 किमी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, गुरुवारी रात्री 11:04 वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 4.1 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 33.20 अंश उत्तर अक्षांश आणि 75.56 अंश पूर्व रेखांश जमिनीपासून 5 किमी खोलीवर होता.
जम्मू-काश्मीरच्या कटरा पूर्वेला मंगळवारी पहाटे 2:20 वाजता पहिला हादरा जाणवला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 एवढी होती. जम्मू प्रदेशातील डोडापासून 9.5 किमी ईशान्येस दुपारी 3.21 वाजता 2.6 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता जम्मू भागातील उधमपूरपासून 29 किमी पूर्वेला 2.8 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. बुधवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी उधमपूरपासून 26 किमी आग्नेय दिशेला 2.9 रिश्टर स्केलचा चौथा भूकंप झाला. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यानंतर शुक्रवारी पहाटे भूकंपाचा सातवा धक्का जाणवला.