सावन कुमार टाक प्रसिद्ध दिग्दर्शक यांचं निधन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई: ‘सौतन’, ‘सनम बेवफा’सह 19 हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं आज निधन झालं.

फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मृत्यू समयी त्यांचं वय 86 होतं. ते अविवाहित होते. त्यांच्यामागे तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. सावन कुमार टाक यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर (bollywood) शोककळा पसरली आहे. अभिनेता सलमान खान (salman khan) यांनीही सावन कुमार टाक यांच्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. टाक यांचं निधन झाल्यानंतर भावूक पोस्ट लिहित सलमानने शोक व्यक्त केला आहे.

सावन कुमार टाक यांचे पीआरओ मन्टू सिंह यांनी त्यांच्या निधनाची पृष्टी केली आहे. टाक हे 86 वर्षाचे होते. ते अविवाहित होते. त्यांच्या मागे तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना हार्टचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं. अखेर आज दुपारी 4 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं, असं मन्टू सिंह यांनी सांगितलं. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यांचं हृदयही व्यवस्थित काम करत नव्हतं. त्यांना फुफ्फुसाचा विकार होता असं डॉक्टरांनी सांगितलं. आजच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

19 सिनेमांचं दिग्दर्शन

टाक यांनी अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी 1972मध्ये गोमती किनारे या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सनम बेवफा, सौतन, साजन बिना सुहागनसह एकूण 19 सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

कहो ना प्यार है सारखी गाणी लिहिली

सावन कुमार टाक उत्कृष्ट गीतकारही होते. त्यांनी अनेक उत्तम गीते लिहिली आहेत. त्यांनी, कहो ना प्यार है, प्यार की कश्ती में, जानेमन जानेमन, और चांद सितारे सारखी लोकप्रिये गीते लिहिली होती.