भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान लष्करातील कर्नलने 30 हजार रुपये दिल्याची कबुली

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळून पकडण्यात आलेल्या एका दहशतवाद्याने भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान लष्करातील कर्नलने 30 हजार रुपये दिल्याची कबुली दिली आहे.

गेल्या 48 तासात जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले यावेळी भूसुरुंगाच्या स्फोटात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला तर, एका दहशतवाद्याला जिवंत पडण्यात सैन्याला यश आले आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान संबंधित दहशतवाद्याने वरील कबुली दिली आहे.
जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव तबराक हुसेन असे असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील सब्जकोट गावचा रहिवासी आहे. अधिक चौकशीत, दहशतवाद्याने भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या त्यांच्या योजनेची कबुली दिली आहे. याबाबतच लष्कराकडून एक नोट जारी करण्यात आली आहे.
जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याला 21 ऑगस्ट रोजी सकाळी नौशेरा भागातील झांगार सेक्टरमध्ये अटक करण्यात आली. या दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता करण्यात आलेल्या गोळीबार हा जखमी झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तबराक हुसेन याने सांगितले की, त्याला पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या कर्नल युनूस चौधरी नावाच्या कर्नलने पाठवले होते, ज्याने त्याला 30,000 पाकिस्तानी रुपये दिले होते. तबरकने असेही उघड केले की, 21 ऑगस्ट 2022 रोजी कर्नल युनूस चौधरी यांनी भारतीय चौकीला लक्ष्य करण्यासाठी पुढे जाण्याचे आदेश दिले होते अशी कबुली हुसेन दिली