समुद्र किनाऱ्यावर पोलिसांना एका मुलीची बॉडी मिळाली, जवळ जाताच भलतेच काय?

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

समुद्र किनाऱ्यावर पोलिसांना एका मुलीची बॉडी मिळाली. याबाबत पुढील तपास करत असताना पोलिसांना जे समजलं ते अतिशय धक्कादायक होतं. पोलिसांना मिळालेली बॉडी कुणा मुलीची नव्हती, तर ती होती एक सेक्स डॉल.
बँकॉकच्या पूर्वेकडे साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर थाय प्रांतातील चोनबुरीमध्ये बँग सेन समुद्रकिनाऱ्यावर नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. 18 ऑगस्टरोजी या समुद्रकिनाऱ्यावर एका मुलीची नग्न बॉडी तिथल्या नागरिकांना दिसली. समुद्रकिनाऱ्यावर एक नग्न बॉडी आहे समजल्यावर याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांना याबाबत माहिती देताना महिलेच्या चेहऱ्यावर केवळ एक टीशर्ट असल्याचं सांगितलं गेलं. ही बातमी सदर परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. पोलिसांना याबाबत सूचना मिळाल्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पोलिसांनी या बॉडीच्या चेहऱ्यावरही टीशर्ट हटवताच पोलिसांनाही धक्का बसला. या घटनेनंतर सोशल मीडियावर याबाबत प्रचंड चर्चा आहे.
पोलिसांना मिळालेली बॉडी कुणाही मुलीची नव्हती. ही एक सेक्स डॉल असल्याचं तपासात समजलं. पोलिसांच्या माहितीनुसार ती सेक्स डॉल एका जपानी मॉडेल मॉडेल एवी आयडलसारखी दिसणारी होती. या डॉलची अनुमानित किंमत ही 469 पाउंड म्हणजेच साधारणतः 44 हजार रुपये असल्याचं समजतंय. या घटनेबाबत जो फोटो व्हायरल होतोय त्यात बिना कपड्याची सेक्स डॉल पाहायला मिळतेय.

पोलिसांच्या माहितीप्रमाणे कुणीतरी ही सेक्स डॉल नदीत फेकली असेल, त्यानंतर ती वाहत वाहत समुद्रावर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या ही डॉल पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली आहे. या डॉलचा चेहरा गायब असला तरीही मालकाला ती हवी असल्यास पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यानं तिला घेऊन जावं असं पोलीस म्हणतात.
बांग सेन जिल्ह्याच्या पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, “18 ऑगस्ट 2022 रोजी आम्हाला समुद्रावर एका नग्न मुलीची बॉडी असल्याची माहिती मिळाली. काहींनी ही मुलगी मेल्याचं सांगितलं. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांची एक टीम तिथे पोहोचली. पोलिसांच्या टीमला देखील दुरून तो एक महिलेचा मृतदेह आहे असं वाटलं. मात्र जवळून पाहिल्यानंतर ती एवी सारखी दिसणारी डॉल होती.”