माणीकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने कारागृहातील कैद्यांसाठी शेकडो पुस्तकांचं वाटप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक मा.एस.एम.देशमुख सर यांनी माणीकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने नुकतेच कारागृहातील कैद्यांसाठी शेकडो पुस्तकांचं वाटप बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी जगदाळे, कारागृह अधीक्षक विलास भोईटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याणराव कुलकर्णी,जेलर वडणे, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक,जेलर वडणे,जेलर मुलाणी यांच्या उपस्थितीत वाटप केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, राज्य कार्यकारिणी सदस्य संपादक अनिल वाघमारे,जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, रो.उदय नागरगोजे,लढा दुष्काळाशी फाउंडेशन चे ॲड.राज पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.