ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडास भेट


परळी : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि स्मृतिचिन्ह दिले .यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मुंडे साहेब माझे खूप चांगले मित्र होते. ते एक लोकनेता होते लोकांना त्यांच्या प्रती स्नेह होता . वैचारिक मतभेद असतील तरीही लोकांमध्ये त्यांच्या प्रति आदराची भावना होती लोकशाहीमध्ये हेच हवे असते त्याचे ते उत्तम प्रतीक होते, असे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी प्रतिपादन केलेयाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ , ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटीआदींची प्रमुख उपस्थिती होती.
Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button