ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पॅसेंजर ट्रेनने मालगाडीला दिली धडक 50 हून अधिक प्रवासी जखमी


राज्यात एका ट्रेनचा मोठा (Train Accident) अपघात झाला आहे. राज्यातल्या गोंदियामधून (Gondia)ही रेल्वे अपघाताची घटना समोर येत आहे.
येथे एका पॅसेंजर ट्रेनने मालगाडीला धडक दिली. या अपघातात पॅसेंजर ट्रेनचा एक (Passenger Train Derailed) डब्बा रुळावरून घसरला.या अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान जखमी प्रवाशांची (Injured passengers) प्रकृती गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याचं समजतंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button