चाकूने भोसकुन दगडानं ठेचून हत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अकोला : अकोला शहरात रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाची चाकूने वार करत दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विनोद टोंबरे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर हि हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या (Murder) झालेला युवक हा पंचशीलनगर या ठिकाणचा रहिवाशी होता. हि हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सिव्हिल लाईन्स पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
विनोद टोंबरे याची पूर्व वैमनस्यातून हत्या (Murder) केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली. हि हत्या (Murder) केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. सिव्हिल लाईन्स पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.