ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात


शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना दुखापत झाली आहे.

त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button