ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

विहिरीत एखाद्या व्यक्तीची सावली दिसली नाही तर पुढील 6 महिन्यांत काय?


वाराणसी : या जगात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या विज्ञानाच्या नियमांना मागे टाकतात. अशा अनेक समजुती आहेत, ज्यावर विज्ञान बसत नाही, पण तरीही लोकांचा या विश्वासांवर पूर्ण विश्वास आहे.
यूपीच्या बनारसमधील मणिकर्णिका घाट आणि काशी विश्वनाथ बाबाच्या मंदिराशिवाय हिंदू धर्माची अनेक रहस्ये दडलेली आहेत.या शहरात धर्मराज यमराजाशी संबंधित माहिती व संकेत आढळतात. याठिकाणी एक मंदिर आहे, ज्यामध्ये एक रहस्यमय विहीर आहे. ही विहीर भक्तांना त्याच्या मृत्यूचा संकेत देते, असा दावा केला जातो.

हे मंदिर मीरघाटाच्या माथ्यावर बांधलं गेलं आहे. या मंदिराचे नाव धर्मेश्वर महादेव मंदिर असून याठिकाणी एक धर्मकुप देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, मंदिराच्या पुजाऱ्याचे म्हणणं आहे की, या विहिरीचा इतिहास गंगा पृथ्वीवर येण्यापूर्वीचा आहे. हे यमाने बांधलं होतं. तसंच धर्मराज यमाने याठिकाणी गंगा उतरण्यापूर्वी तपश्चर्या केली होती, असं मानलं जातंय.

या गूढ विहिरीबद्दल अशी धारणा आहे की, ही विहीर मृत्यू दर्शवते. या विहिरीत एखाद्या व्यक्तीची सावली दिसली नाही तर पुढील 6 महिन्यांत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, असं म्हटलं जातं. तसंच या पुरातन मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की, याठिकाणी भगवान शिव आणि यमराज देव एकत्र बसतात.

धर्मेश्वर महादेव प्राचीन मंदिरात बांधलेली धर्म विहीर यमराजानेच बांधली होती, अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. असं मानलं जातं की, ज्या लोकांची सावली विहिरीत दिसत नाही, त्या व्यक्तीचा पुढील 6 महिन्यांत मृत्यू होतो. याचा कोणताही पुरावा सापडला नसला तरी आजूबाजूच्या लोकांचा असा विश्वास आहे.

काय आहे कहाणी?
असं मानलं जातं की, भगवान शिव पृथ्वीवर मरणाऱ्याला स्वर्ग किंवा नरकात नेण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी यमराज भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होते, परंतु यमराजांना भगवान शंकराला प्रसन्न करण्यात यश मिळत नव्हते. यावर भगवान विष्णूंनी यमराजांना तलाव बनवून त्यात स्नान करून देवाची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला.

यानंतर यमराजाने तेच केले आणि भगवान शिव यमराजावर प्रसन्न झाले, त्यानंतर भगवानांनी यमराजांवर लोकांच्या स्वर्ग आणि नरकात जाण्याची जबाबदारी सोपवली. असंही म्हणतात की, भगवान शंकराने यमराजाचं नाव देखील ठेवलं होतं, तेव्हापासून ही प्रथा चालू आहे की, जर एखाद्या व्यक्तीला विहिरीत सावली दिसली नाही तर त्या व्यक्तीचा 6 महिन्यांत मृत्यू होतो.

वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button