क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पत्नीच्याअनैतिक संबंधातून पतीचा गळा दाबून खुन


दिग्रस : तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली सोमवारी एक case of murder मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दिग’स पोलिसांनी यवतमाळ येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.



शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आल्याने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मृतकाचा चुलतभाऊ हर्षद नागोराव देशमुख यांनी घातपात झाल्याची तक’ार दिली होती. यात पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली.

दिग्रस-पुसद मार्गावरील सिंगदजवळ पुलाखाली सोमवार, 1 ऑगस्ट रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला होता. case of murder मृतदेहाच्या हातावर सचिन नाव गोंदलेले आढळल्याने पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या अवाहनानंतर हा इसम उमरखेड येथील सचिन वसंतराव देशमुख असल्याचे उघडकीस आले. मृतक सचिन त्याच्या पत्नीकडे आकोटला गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह सिंगद येथे पुलाखाली आढळून आला. पोलिसांना या मृतदेहाबाबत संशय येत असल्याने त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळ येथे पाठविला. त्यानंतर दिग’स पोलिसांना प्राप्त वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग’स पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक कैलास घट्टे, उपनिरीक्षक विशाल बोरकर, सुजीत जाधव करीत आहेत.

आकोट येथून पत्नीला भेटून निघाल्यानंतर सचिनचा case of murder मृतदेह सिंगद येथे कसा आला, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र पोलिसांच्या खोलवर तपासात, अनैतिक संबंधातून गळा दाबून खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग परदेसी, सायबर टीम व उमरखेड येथील पोलीस निरीक्षक माळवे व त्यांचे सहकारी यांनी सखोल चौकशी केली.

या चौकशीत मृतकाची पत्नी धनश्री सचिन देशमुख व तिचा प्रियकर शिवम चंदन बछले यांच्या सहभाग असल्याचे case of murder निष्पन्न झाले. धनश्री देशमुख अकोट येथे वनरक्षक होती, तिचा प्रियकर शिवम चंदन बछले परतवाडा येथे वनरक्षक होता. तर पती सचिन देशमुख (रा.उमरखेड) हा प्राध्यापक होता. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button