चीनने आपल्या हवाई दलाला तैनात केलं,अमेरिकेचा तैवानला पाठिंबा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवान बेटाच्या सभोवताली सैनिकी युद्धसरावावा सुरुवात केली आहे. केवळ तैवानच्या समुद्रातच नाही तर हवाई क्षेत्रात देखील चीनने आपल्या हवाई दलाला तैनात केलं आहे

नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला चीनने विरोध केला होता. तैवानला धडकी भरेल असा युद्धसराव सुरु आहे.

फायटर जेट , युद्धनौका तर केवळ २ मैल अंतरावर असणार आहे. साऊथ चायना सी South china sea (दक्षिण चीनी समुद्र) वर आपलं वर्चस्व गाजविण्यासाठी चीन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे . चीन तैवानवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या महायुद्धात चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली होती. चीनपासून अगदी १०० मैलांवर वसलेला तैवान एक बेट आहे. साउथ चायना सी हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा मानला जातो.

अमेरिकेने तैवानला आपला पाठिंबा दिलाय. तसंच अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसिंच्या भेटीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यात जुंपली आहे. चीनने नॅन्सी पेलोसिंनी तैवानला भेट देऊ नये असं बजावलं होतं.
7 ऑगस्टपर्यंत तैवानच्या सभोवताली चीनी सेना युद्धसराव करणार आहे. चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रातून यात्री विमानांवर बंदी घातलीय. नॅन्ली पेलोसी यांचा दौरा संपत नाही तोवरच चीनने २७ फायटर जेट तैवानच्या हद्दीत दाखल झाले होते. यामुळे तैवान आणि चीनदरम्यान युद्धपरिस्थिती निर्माण होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अमेरिकेने तैवानला पूर्ण पाठींबा दिला होता. या स्थितीत अमेरिका नेमंके काय पाऊल उचलतेय हे पहावं लागेल