ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

बीड नगरपालिकेच्या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित


महावितरणचे पालिकेकडे जवळपास दोन लाख रुपये वीज बिल थकीत होते. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी वीज पुरवठा खंडित केला. मात्र महावितरणला आम्ही चेक दिला आहे. त्यामुळे वीज पुरवठा अखंडित करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. असं उमेश ढाकणे म्हणाले.

बीड : बीड नगरपालिका इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरणने नगरपालिका प्रशासनाला चांगलाच दणका दिला. महावितरणने नगरपालिकेच्या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
एकीकडे शहरातून (Beed News) लाखोंची वसूली होत असताना दुसरीकडे वीज बील भरण्यापोटी पैसा नसल्याचे कारण नगरपालिका समोर करते. यामुळे वीज कंपनी थेट नगरपालिकेचा विद्युत पुरवठा तोडते; ही एकप्रकारे नगर पालिकेवर आलेली नामुष्की म्हणावी लागेल. लाईट नसल्याने सर्वर डाऊन होत आहे. त्यामुळे नगरपाकिकेतील अनेक कॉम्प्युटरवर होणारे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे पालिकेमध्ये आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button