असही झाल ! पावसाचा धुमाकूळ वाळवंटात असलेली ही शहरं जलमय

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अबुधाबी : बातमी अशी जी पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ज्या दुबई शहराचं तुम्हा आम्हाला कायम आकर्षण वाटत आलंय त्या दुबईला पावसानं झोडपून काढलंय.
तर दुबईच्या आजूबाजूची अनेक शहरं पाण्यात बुडाली आहे. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी दिसतंय. इथल्या रस्त्यांना अक्षरश: नद्यांचं स्वरूप आलंय.

(frightening situation due to flood in uae after 27 years such rain many houses submerged)

पावसामुळे इथं भयानक स्थिती निर्माण झाली. अनेक घरं पाण्याखाली बुडाली असून जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. दुबईजवळ असलेल्या शारजाह, रास अल खैमाह आणि फुजराह या भागाला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. वाळवंटात असलेली ही शहरं जलमय झाली आहेत.

पहिल्यांदाच गेल्या 27 वर्षात इतकी भयानक स्थिती पाहायला मिळतीय. अनेकांची वाहनं पुराच्या पाण्यात अडकली आहे. लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायेत. ही तीच शहरं आहेत ज्यांचं भारतीयांना विशेष आकर्षण आहे.

गगनचुंबी इमारती आणि चांगल्या जीवनशैलीसाठी ही शहरं ओळखली जातात मात्र याच शहरांना आता पुराचा वेढा पडलाय.