ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आईच्या कष्टाचे चीज; लेकीने बारावीत पटकवला प्रथम क्रमांक


आईच्या कष्टाचे चीज; लेकीने बारावीत पटकवला कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळवले ८४ टक्के गुण



 

उमरगा : उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील कांबळे कुटुंबातील मुलींचे घवघवीत यश. मुलीच्या वडीलांचे दहावीत असताना अपघाती निधन झाले. दुःख बाजूला सारून मुलीने दहावीतही तिने शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविला, घरची हलाखीची परिस्थिती असतानाही आईने मोलमजुरी करून मुलीच्या शिक्षणासाठी काही कमी पडू द्यायचे नाही, हा चंग बांधला होता.

 

आईच्या कष्टाचे चीज करत सुपतगाव येथील प्रियंका कांबळे या विद्यार्थिनीने देखील मोठ्या जिद्दीने अभ्यास करून बारावी परीक्षेत ८४.१७ टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले.
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील प्रियंका भगवंत कांबळे हिचे पहिली ते सातवी प्राथमिक शाळेत, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच भिमराव लामजने प्रशालेत झाले, त्यानंतर अकरावीसाठी तिने लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात प्रवेश घेतला.

 

प्रियंका तशी अभ्यासात हुशार, पण घरची परिस्थिती हलाखीची, वडील वारले असता घरात कमावता गेल्याने, आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते. यातून ते आपल्या मुला मुलीच्या शिक्षणाचा खर्च करते. सुट्टीच्या दिवशी प्रियंका ही आईला मदत करण्यासाठी जाण्याचा हट्ट धरायची. पण आई म्हणायची, बाळा माझ्या नशिबी मोलमजुरीचे दिवस आले, ते तुझ्या नशिबी नको, तू शिक, मोठी हो , असे म्हणत. मुलीला ना कधी कामावर येऊ दिले, ना शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला. बससाठी दरमहा लागणारे ५०० रुपयेही कधी जवळ नसले तरी उसनवारी करायच्या, पण वेळेला पैसे द्यायची, असे प्रियंका सांगते. आईच्या या कष्टाचे चीज करत प्रियंका हिने बारावीत कला शाखेतून ८४.१७ टक्के गुण घेत लोहारा शहरातील भानुदास राव चव्हाण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल प्रियंका कांबळे हिचे विविध स्तरातून, गावातून कौतुक व्यक्त होत आहे.

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button