क्राईम

17 मुली आणि 7 मुलं… घरातून येत होता विचित्र आवाज; दार उघडलं आणि बसला मोठा धक्क


दिल्लीलगत असलेल्या गुरुग्राममध्ये हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हरियाणा पोलिसांनी एकाच वेळी पाच स्पा सेंटर्सवर छापे टाकून 17 मुलींसह सात मुलांना अटक केली आहे.



हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळातली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकून वेश्याव्यवसायातल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली-एनसीआर, गाझियाबाद, फरिदाबाद आणि नोएडा इथल्या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत.

गुरुग्राममधल्या पाच स्पा सेंटर्समध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हरियाणा पोलिसांना मिळाली होती. सोमवारी (15 एप्रिल) संध्याकाळी पोलिसांनी एक सापळा रचला आणि ते स्वत: ग्राहक म्हणून तिथे गेले. या संपूर्ण कारवाईसाठी पोलिसांची पाच पथकं तैनात करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी 17 मुलींची सुटका केली. पकडलेल्या मुलींनी सांगितलं, की पैशांसाठी त्या अनेक महिन्यांपासून स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करत होत्या.

हरियाणा पोलिसांनी स्पा सेंटरच्या पाच मालकांविरुद्ध मानेसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या छाप्यात स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून सोमवारी संध्याकाळी मानेसर पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांनी एसीपी मुख्यालयातल्या विशेष अधिकारी सुशीला यांच्या नेतृत्वाखाली पाच वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या. पाच पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये होते. प्रत्येकी दोन हजार रुपये भरून त्यांना बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं होतं.

पहिल्या टीमने सेक्टर-2मध्ये असलेल्या आम्रपाली इमारतीत, दुसऱ्या टीमने सिल्की स्पा सेंटरमध्ये, तिसऱ्या टीमने न्यू अरोमा स्पा सेंटरमध्ये, चौथ्या टीमने न्यू पॅलेस स्पामध्ये आणि पाचव्या टीमने जेड ब्लॅक स्पा सेंटरमध्ये जाऊन कारवाई केली. या सर्व स्पा सेंटर्सवर छापे टाकल्यानंतर ग्राहक आणि मुली सापडल्या.

पोलिसांच्या छाप्यादरम्यान ग्राहक व मुली आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या. पोलिसांच्या पहिल्या पथकाने छापा टाकला तेव्हा तिथे सहा मुली आणि चार ग्राहक सापडले. सिल्की स्पा सेंटरवरच्या छाप्यात तीन मुली आणि दोन ग्राहक सापडले, एनएसयू पॅलेस स्पा सेंटरवरच्या छाप्यात तीन मुली आणि एक ग्राहक सापडला, झेड-ब्लॅक स्पा सेंटरमध्येही मुली आणि ग्राहक आक्षेपार्ह स्थितीत सापडले.

गुरुग्राम पोलिसांनी या छाप्याबाबत माहिती देताना सांगितलं, की स्पा सेंटरमध्ये सहा महिन्यांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. वेश्याव्यवसायाची माहिती मिळताच पोलिसांनी पथकं तयार करून छापे टाकले. वेगवेगळ्या स्पा सेंटरमधून मुलींना ताब्यात घेतलं. छाप्यादरम्यान, पाच स्पा सेंटर्समधून 17 मुलींची सुटका करण्याबरोबरच त्यांच्या मालकांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी पाच स्पा सेंटरच्या मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button