बीडच्या गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : पैठण येथील जायकवाडी धरण 97 टक्के भरल्याने उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

जायकवाडीमधून सोडण्यात आलेले पाणी आता बीड जिल्ह्यात पोहचले असून गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मंदिराला पाण्याने वेढले आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सध्या तरी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र अचानक पाऊस झाला तर पूरपरिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील तब्बल 32 गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. गोदा काठ परिसरात शेतकऱ्यांना जाण्यास देखील प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला. सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.