ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

लाईट बिल 3,419 कोटी,मोठा धक्का,रुग्णालयात दाखल


मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना हे तब्बल 3,419 कोटी रुपयांचे वीज बिल आले. बिलाचा आकडा पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. याचदरम्यान प्रियंका यांचे सासरे स्वतःला सावरू शकले नाहीत. त्यांनी मोठा धक्का घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारीत वीज कंपनीने केलेल्या चुकीमुळे लाईट बिलाच्या आकड्यामध्ये घोळ झाला. ही चूक कबूल करीत वीज कंपनीने सुधारित 1,300 रुपयांचे बिल जारी केले. या चुकीच्या दुरुस्तीमुळे ग्वाल्हेर शहरातील शिव विहार कॉलनीतील रहिवासी असलेल्या व मोठ्या चिंतेत सापडलेल्या गुप्ता कुटुंबाला दिलासा मिळाला.ग्वाल्हेर : उन्हाळ्यात दिवसरात्र फिरणारे पंखे, अनेक घरांमध्ये चालू ठेवला जाणारा एसी.. त्यामुळे लाईटचे वाढीव बिल येणे हे स्वाभाविकच मानले जाते. एरव्ही दर महिन्याला चारशे-पाचशेच्या आसपास येणारे बिल जास्तीत जास्त दुपटीने अधिक अर्थात 1 हजार ते 1200 च्या आसपास लाईटबील येऊ शकेल, असा अंदाज बांधला जातो.
हेच बिल जर लाख किंवा कोटीच्या घरात गेले तर …. ही नुसती कल्पनादेखील नकोशी करून सोडेल. अर्थात लाख किंवा कोटीच्या घरातील आकडा नक्कीच घाम फोडेल. पण एका वीजग्राहकाला आलेल्या लाइट बिलने त्या घरातील वृद्ध इसमाला थेट रुग्णालया (Hospital)त दाखल करावे लागले. कारण लाईट बिलचा आकडा एक-दोन लाख किंवा कोटी नव्हता तर ते बिल चक्क 3,419 कोटी रुपये आलेले. महिलेच्या हातात हे लाईट बिल पडताच तिच्या सासऱ्याला मोठा धक्का बसला आणि त्या वृद्धाला लगेचच रुग्णालयात दाखल करावे लागले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button