बंगालची शेरनी बसलीय याद राखा – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बंगालची शेरनी बसलीय याद राखा, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला असतानाच झारखंडमधून मोठी बातमी येत आहे.
झारखंडमध्ये सत्ताधारी असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपाचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

जेएमएमचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी हे भाजपाचे आमदार लवकरच हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील असे म्हटले आहे. यामुळे झारखंडच्याच नाही तर दिल्लीच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे.

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता. केंद्रात सत्तेत असल्याने तसेच भाजपाची लाट असल्याने भाजपा सोडून जाणारे तसे फार कमी आहेत. उलट भाजपातच अन्य पक्षांतून इनकमिंग सुरु आहे. असे असताना झामुमोने भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्याने दिल्ली सतर्क झाली आहे.