ताज्या बातम्या

बंद इमारतीत आढळला युवकाचा मृतदेह; खळबळजनक घटना, नागरिकांमध्ये घबराट


विक्रोळी पूर्व येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन पूर्व रोड परिसरात पडीक इमारतीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.



इमारतीमध्ये मृतदेह आढळल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विक्रोळी पूर्व स्टेशन रोड लगत असलेल्या हरियाली व्हिलेज मच्छी मार्केट मागे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत रखडलेल्या इमारती उभ्या आहेत. येथील पार्किंग झोनमध्ये गढूळ पाणी देखील साचलं आहे. या साचलेल्या पाण्यात गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेह पाण्यात असल्याने त्याचा वास परिसरात सर्वत्र पसरला होता. घटनास्थळी अग्निशमन दल व विक्रोळी पोलीस ठाणे पोलीस पोहोचले व या मृतदेहास ताब्यात घेतले आहे. पुढील क्रियेसाठी या मृतदेहास जवळील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याच पाण्याच्या डबक्यात गेल्या वर्षी देखील एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. आता ही दुसरी घटना असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा युवक याच परिसरात राहत असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास विक्रोळी पोलीस ठाणे करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button