क्राईमनाशिकमहत्वाचेमहाराष्ट्र

महाराष्ट्र पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरला,तरुणावर झाडल्या गोळ्या या घटनेत त्याचा मृत्यू ..


नाशिक : नाशिक गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. मालेगावमध्ये तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. मालेगावच्या ओवाडी नाला भागात ही घटना घ ।डली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.



घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन जणांचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. शहरातील नॅशनल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ओवाडी नाला भागात एका तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

इब्राहीम शेख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रमजानपुरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या तरुणाची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली? हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालेगावात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button