व्हिडिओ न्युज

VIDEO – व्यक्तीने हरणाच्या पिल्लाला वाचवलं; त्या व्यक्तीसोबत जे घडलं ते….


अडचणीच्या वेळी असे किती तरी लोक आहेत जे मुक्या जीवासाठीही धावून जातात.अशीच एक व्यक्ती जिनं एका हरणाच्या पिल्लाचा जीव वाचवला. त्यानंतर महिनाभराने त्या व्यक्तीसोबत जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडिओ पहा👇👇👇👇

हरणाचं एक पिल्लू खड्ड्यात पडलं होतं. एका व्यक्तीने त्या हरणाला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला आपल्या कारमध्ये बसवून जंगलात नेल. जंगलात त्या हरणाच्या पिल्लाची त्याच्या आईशी भेट घडवून दिली. हरणाच्या पिल्लाला व्यक्तीने त्याच्या आईच्या स्वाधीन केलं.

20 वर्षे वाघाच्या प्रेमात पार वेडावली महिला! त्याला किस केलं अन्…; VIRAL

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता आईकडे गेल्यानंतरही हे पिल्लू पुन्हा त्या व्यक्तीकडे येतं आणि मान झुकवून खाली बसतं. आपल्याला जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे ते आभार मानतं आणि त्याचा निरोप घेतं. ती व्यक्तीसुद्धा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते.

या घटनेला एक महिना उलटला. त्यानंतर व्यक्तीसोबत असं काही घडलं की तोसुद्धा चक्रावून गेला. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहाल की व्यक्ती दरवाजा उघडतो आणि दरवाजाबाहेर तेच हरणाचं पिल्लू आहे, ज्याचा जीव या व्यक्तीने वाचवला. पण ते पिल्लू एकटं आलं नाही. तर हरणाचा कळप त्याच्यासोबत आहे. आपला जीव वाचवेल्या व्यक्तीचे आभार मानण्यासाठी हे हरण आपल्या कुटुंबासह त्या व्यक्तीच्या घरी आलं. हरणाच्या संपूर्ण कुटुंबाने त्या व्यक्तीचे आभार मानले.

Oh No! कुत्र्याचं पिल्लू समजून रस्त्यावर दिसलेल्या खतरनाक प्राण्याला घरी घेऊन गेली व्यक्ती; त्यानंतर जे घडलं ते…

आयएफस सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडला आहे. व्हिडीओ खूप सुंदर असल्याची प्रतिक्रिया अनेक युझर्सनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button