मनोरंजनव्हिडिओ न्युज

Video : कार रस्त्यावर धावता धावता अचानक हवेत उडू लागली अन ..


कार म्हटलं की ती चार चाकं असणारी आणि रस्त्यावर धावणारी गाडीच आपल्या डोळ्यासमोर येते. कधी हवेत उडणारी कार तुम्ही पाहिली आहे का? कदाचित पाहिली असेल तीसुद्धा एखाद्या फिल्ममध्ये हॉलिवूड फिल्ममध्ये फ्लाइंग कार तुम्ही पाहिल्या असतील. पण प्रत्यक्षात तर नक्कीच नाही. सध्या अशाच एका फ्लाइंग कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रस्त्यावर धावता धावता ही कार अचानक हवेत उडी लागली. पंख उडवत धरतीवरून आकाशात एखाद्या पक्ष्याने भरारी घ्यावी, अगदी तशीच या कारनेही घेतली. व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. किंबहुना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हा व्हिडीओ पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही कार रस्त्यावरून वर जाते म्हणजे ती हवेत उडू लागते. मग ड्रायव्हर अतिशय वेगाने गाडी खाली आणतो आणि नंतर वेग आणखी वाढवतो. यानंतर, त्याने कार एका ठिकाणाहून हवेत उडवली, जी दूरवर गेली. यानंतर, ड्रायव्हर हळूवारपणे ब्रेक लावून त्याच्या विशिष्ठ टेक्निकनं कार थांबवतो.

व्हिडिओ पहा👇👇

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काही जणांनी अशा प्रकारचे स्टंट करण्याआधी स्वतःच्या जीवाचा विचार करा असा सल्ला दिला आहे. फक्त प्रसिद्धीसाठी कोणतीही काळजी न घेता स्टंट करणाऱ्यांनी हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवावे. केवळ चित्रपटात बघून, आवडत्या कलाकाराला स्टंट करताना बघून काही जण त्यांचे अनुकरण करतात. पण चित्रपटात, शूटिंगमध्ये आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते हे सर्वसामान्यांना माहित नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्टंट करण्यापुर्वी त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button