ताज्या बातम्या

सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात,२४ तासांत देशात कोरोनाचे ८२६ नवीन रुग्ण


नवीन कोरोना व्हेरियंट जे.१ च्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नव्या व्हेरियंटनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८२६ नवीन रुग्ण आढळले आहेत.

२४ तासात महाराष्ट्रात सर्वाधिक १३४ बाधितांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात १३१ रुग्ण आढळले आहेत. बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४००० च्या वर गेली आहे.

रविवारी, देशात कोरोनाची ८२६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि तीन लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नवीन रुग्ण आढळल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या ४३०९ झाली आहे. सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा पहिल्यांदाच कोरोनाची इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आता देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना जे.१ च्या नवीन प्रकाराने देशात कहर केला आहे. दरम्यान, भारतात रविवारी ८२६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली, जी गेल्या २२७ दिवसांत किंवा सात महिन्यांतील सर्वाधिक आहे.

शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून,उसाचा फडच दिला पेटवून


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button