क्राईम

नेत्यांच्या हत्येचा कट, गुजरातमधून मौलवीस अटक, पाकिस्तानातून मागवत होता शस्त्रे, दिली होती १ कोटींची सुपारी !


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरत गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद सोहेल उर्फ ​मौलवी अबुबकर तेमोल (वय २७) याला सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, मौलानाच्या मोबाईल फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अटक करण्यात आलेला मौलवी पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्या ठिकाणावरुन शस्त्रास्त्रे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. आरोपी मौलाना देशातील नुपूर शर्मा, टी राजासह या हिंदू नेत्यांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.

मोबाईल चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे

मौलानावर माजी भाजप नेत्या नुपूर शर्मा, भाजप आमदार टी. राजा सिंह आणि उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. त्याच्या मोबाईल चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या मौलाना सोहेल पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांशी संपर्कात होता. हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी आणि पाकिस्तानातून शस्त्रे मागवल्याबद्दल त्याच्या मोबाइल फोनवरून झालेल्या चॅटही पोलिसांना मिळाले आहे.

मुलांना धार्मिक शिक्षणाचे काम

पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, मौलाना सोहेल अबूबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, मौलवीला सुरतच्या चौक बाजार परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सुरतमधील कामरेज भागातील कर्श गावचा रहिवासी आहे. आरोपी एका दौऱ्याच्या कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करतो आणि गावातील लहान मुलांना धार्मिक शिक्षण देतो. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता काही चॅटिंग आणि कॉल डिटेल्स सापडले.

धमकीचे चॅट

सुरतचे हिंदुत्व नेते उपदेश राणा यांनीही गेल्या महिन्यात धमक्या मिळाल्याची एफआयआर दाखल केली होती. मौलानाच्या कॉल डिटेल्समध्ये धमकीचे चॅटही आढळून आले आहे. आता सुरत गुन्हे शाखेचे पथक तपास करणार आहे. मौलानाने पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या नावाचे कोडवर्ड ठेवले. उपदेश राणा याला ढक्कन हे नाव ठेवले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button