ताज्या बातम्या

हृदयद्रावक! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू


भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या (Palghar) मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावितही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ जखमींना मदत करत उपचारासाठी रुग्णालयात हालवले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

राम मंदिर कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक, प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button