व्हिडिओ न्युज

Video वरमाला गळ्यात पडताच नवरीने नवरदेवाला कानशिलात लगावल्या


लग्नानंतर आयुष्याची नवी इनिंग सुरू होते. नवी स्वप्न उराशी घेऊन हे जोडपं आपलं आयुष्य पुढे नेण्याचं काम करत असतात. कुटुंबीयांकडूनही लग्नात कोणतीही कसूर केली जात नाही.

अत्यंत धुमधडाक्यात लग्न लावू दिलं जातं. मुलीलाही चांगला नवरा मिळावा ही अपेक्षा असते. पण लग्नाच्या दिवशीच जर तिचा होणारा नवरा एक नंबरचा बेवडा आहे हे जर तिला कळलं तर? असाच एक किस्सा एका लग्नात घडला. त्यानंतर जे घडलं ते पाहून वऱ्हाडीही थक्क झाले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून सर्वच अवाक् होत आहे. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीने त्याच्या कानशिलात सटासट लगावल्या. त्यानंतर संतापलेली नवरी तिथून निघून गेली. नवरीचा हा जमदग्नीचा अवतार पाहून सर्वच थक्क झालं. वऱ्हाडींना तर काय बोलावे तेच कळत नव्हते. सर्वच शांत झाले. लग्न मंडपात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.

व्हिडीओत काय?

एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी जमलीत. धार्मिक विधी पार पडला. मंत्रोच्चार झाले. भटजीने सांगताच नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकली. गळ्यात वरमाला पडताच संतापलेल्या नवरीचा राग अनावर झाला. तिने नवरदेवाच्या गळ्यात टाकायची वरमाला फेकून दिली आणि तिथेच नवरदेवाच्या दोनचार कानाखाली सटासट लगावल्या आणि तडक निघून गेली. नवरी अत्यंत संतापलेली होती. तिचा अवतार पाहून सर्वच अवाक् झाले. काय झालं? कसं झालं?

असं काय झालं?

नवरीच्या संतापाचं कारणही तसंच होतं. नवरदेव दारू ढोसून आला होता. त्याने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीला दारुचा प्रचंड वास आला. त्यामुळे नवरी संतापली. तिचा पारा चढला. नवरदेवाला लग्नात शुद्धच राहिली नाही. त्यामुळे संतापलेल्या नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली.

 

मंदिरात अर्पण करतात चक्क दारू आणि सिगारेट, नेमकी काय आहे परंपरा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button