व्हिडिओ न्युज

Video काळजाचा ठोका चुकावणारी घटना,चिमुकल्याला घेऊन उडाला गरुड


मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. इथे प्राणी आणि पक्षांसंबंधीत व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मनोरंजक असतात, तर कधी अशा क्षणांचे असतात. जे धडकी भरवतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.

हा व्हिडीओ गरुडाशी संबंधीत आहे. गरुड हा सर्वात शक्तिशाली पक्षांपैकी एक आहे. तो उंच आकाशात उडत असताना देखील खाली जमीनीवर असलेल्या शिकारीकडे त्याची नजर असते आणि वेळप्रसंगी तो आपल्या शिकाऱ्याल उंच हवेत उडवून नेतो.

वन्य प्राणी आणि पक्षांच्या रोजच्या जीवनाचा शिकारी हा एक भाग असलातरी माणसांच्या दुनियेत हे फारच धोकादायक आहे.

अशाच एका गरुडानं एका चिमुकल्या बाळाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे दृश्य हृदयाचा ठोका चुकावणारं आहे.

सैजन्य news18 लोकमत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुटुंब उद्यानात पिकनिकसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना एक लहान मूलही आहे. शिकारी पक्ष्याने मुलाला टार्गेट केलं. वडिलांचं जेव्हा मुलाकडे लक्ष नव्हतं तेव्हा गरुडानं चिमुकल्याला आपल्या पंजानं उचलून घेतलं आणि तो उडण्याच्या प्रयत्नात होता. पण चिमुकल्याचं वजन जास्त असल्यामुळे गरुडाला उडता येत नव्हंत. ज्यानंतर त्याने बाळाला खाली सोडलं.

हे सगळं घडलं तेव्हा बाळाचे वडिल जवळच उभे होते आणि ते बाळाला पकडण्यासाठी धावले. तो पर्यंत गरुडाने बाळाला सोडून दिलं होतं, ज्यानंतर वडिलांनी बाळाला उचललं, बाळ आता ठिक आहे, परंतू थोड्या उंचावरुन पडल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

एनिमल_किंगडम0007 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गरुडाशी संबंधित हा धोकादायक व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गरुडाने मुलावर हल्ला केला.’ मात्र, अनेक लोक या व्हिडिओला खोटा देखील म्हणत आहेत. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचं दिसत आहे. पण तो नक्की कुठला आहे आणि कधी काढला गेला? याची पुष्टी झालेली नाही.

https://www.navgannews.in/crime/36810/

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button