व्हिडिओ न्युज

Video जादूगरने तरुणीच्या स्कार्फमधून काढला विषारी साप


जादूगर आपली जादूची कांडी फिरवून अनेक कला करतो. यातील काही जादूचे प्रयोग हे डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीत असे असतात. तर काही व्हिडीओ खरोखर भयभीत करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये जदुगरची कलापाहून सगळ्यांची पळापळ झाली.



व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका हॉटेलमध्ये सर्वजण जेवणाचा अस्वाद घेत आहेत. यापैकी एका टेबलावर एक मुलगी आणि 2 मुलं बसलीत. यातला एक मुलगा जादूगर आहे. आपली कला दाखवण्यासाठी हा मुलगा समोर बसलेल्या तरुणीच्या गळ्यातील स्कार्फ घेतो. ऑरेंज रंगाच्या या स्कार्फवर तो आपली जादू करण्यास सुरुवात करतो. सुरुवातीला हा स्कार्फने काय जादू करणार असा प्रश्न पडतो. मात्र पुढे जे घडतं ते चकित करणारं आहे.

जादूगरसमोर टेबलवर मीठ आणि मासालाची बॉटल असते. तो या स्कार्फवर थोडं मीठ टाकतो. मीठ टाकून जादूगर स्कार्फला आपल्या हातांनी गोल गोल फिरवतो. त्यानंतर स्कार्फची लांब घडी करून तो स्कार्फचे एक टोक मुलीच्या दिशेने ठेवतो. त्यानंतर या स्कार्फमधून अचानक एक साप बाहेर येतो. तो साप देखील ऑरेंज रंगाचा असतो.

साप (Snake) बाहेर आलेलं पाहून तरुणी घाबरते आणि ओरडू लागते. तसेच हॉटेलमधील इतर सर्वजण देखील घाबरतात. हा साप आपल्याला चावला तर असं समजून काहीजण पळापळ करू लागतात. सोशल मीडियावर जादूगरने केलेली ही जादूगारी फार व्हायरल होत आहे

व्हिडीओ पहा👇👇👇👇

.https://www.instagram.com/reel/Cz4ToSLP3BF/?igshid=OGY3MTU3OGY1Mw==

@xaviermortimer या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूव मिळालेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button