राजकीय

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन , 55 दिवसांत आचारसंहिता लागणार


नागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला असल्याची माहिती समोर आलीये. भाजपचा हाच मेगाप्लान एबीपी माझाच्या हाती लागलाय. 55 दिवसांता आचारसंहिता लागणार असून सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिले नसून 55 दिवसांत आचारसंहिता लागेल, त्यामुळे कामाला लागा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व आमदारांना नमो टार्गेट देण्यात आलं आहे. आज देवगिरीवर झालेल्या बैठकीत तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांच्या संख्येबाबत कानउघडणी देखील करण्यात आलीये. याच बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांचा क्लास घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपचा मेगाप्लान नेमका काय?

25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो अॅप डाऊनलोड करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आमदारांनं मतदारसंघात किमान 30 हजार अॅप डाऊनलोड करुन घ्यावेत. आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो अॅपवर घालवावीत. मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करावेत, बूथप्रमाणे सुपर वॉरियर देखील नेमावेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला आता जास्त दिवस नाहीत. फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा देखील निघणार आहे. ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल, असा मेगाप्लान भाजपकडून तयार करण्यात आलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं?

येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या शेवटी लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे, कारण मागील निवडणुका देखील याच दरम्यान लागल्या होत्या. त्यामुळे आता मोजून 50 ते 60 दिवसंच शिल्लक आहेत आचारसंहिता लागण्यासाठी. त्यामुळे निवडणूक आयोग यासंदर्भात काय दिशा घेणार हे माहित नाही, पण 60 ते 65 दिवसांकरिता निवडणूक लावणे हे कितपत योग्य आहे, हे केंद्रीय निवडणूक आयोगाने पाहायला हवं, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button