Manoj Jarange Patil

भुजबळांवर मी आयुष्यभर बोलणार.. त्यांना सुट्टीच नाही – जरांगे-पाटील


माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली आहे. असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे. भुजबळांच्या विधानावर जरांगे-पाटलांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “छगन भुजबळ काहीही वक्तव्य करत आहेत.

माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगून गुन्ह्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न भुजबळांकडून केला जातोय. हेच देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. सरकारही भुजबळांना घाबरत आहे.”

“भुजबळ मंत्री असून त्यांनी चांगलं बोलावं. मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नये. आम्ही ओबीसी बांधवांबद्दल एक शब्द तरी काढतो का? भुजबळांवर मी आयुष्यभर बोलणार.. त्यांना सुट्टीच नाही,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

छगन भुजबळ बधिर झाले आहे. त्यांचं वय झाल्यानं काहीही बोलत आहेत. त्यांना काहीही कळत नाही,” असं टीकास्रही जरांगे-पाटलांनी डागलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button