क्राईम

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यानंतर आता भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू


जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडीयांच्यानंतर त्यांचे भाऊ अजित सिंह यांचेही निधन झाले आहे.

गोगामेडी यांच्या घरात घुसून गोळी झाडली तेव्हा अजित सिंहही घटनास्थळी उपस्थित होते.After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died

भाऊ सुखदेव सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याच्यावरही गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा तत्काळ मृत्यू झाला, मात्र भाऊ अजित सिंह गंभीर जखमी होते.

सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित सिंह यांच्यावर ५ डिसेंबरपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये गोळी लागून जखमी झालेला भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू झाला आहे.

यानंतर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसएमएस हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर जोरदार निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button