व्हिडिओ न्युज

Video: खोड काढली अन् चांगलीच जिरली! खवळलेल्या बैलाने उचलून आपटलं


एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बैलाची विनाकारण खोड काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका बैलाने तरुणावर हल्ला केल्याचे दिसत आहे.

बैलाला डिवचण्याची चूक हा तरुण करतो आणि खवळलेला बैल त्याला थेट शिंगावर घेऊन आपटतो. मुक्या प्राण्याला नाहक त्रास देणे या तरुणाच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी या तरुणाचीच चूक असल्याचे म्हणले आहे.

Oo

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बैलाला विनाकारण डिवचताना त्याला उकसवताना दिसत आहे. तो तरुण मुद्दाम त्या बैलासमोर हातवारे करत आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे तो बैल चांगलाच खवळतो. बैल थेट त्याच्याकडे धावत जातो आणि शिंगाने उचलून फेकतो. बैलाचा हा हल्ला इतका जोरदार होता की तरुणाला चांगली जखम झाल्याची शक्यता आहे.

बैलाच्या हल्ल्यानंतर तरुण जागीच निपचित पडून राहतो. ज्यानंतर काही लोक त्याला उचलून नेतात. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ६.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना या तरुणाचीच चूक असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी विनाकारण मुक्या जिवाला त्रास देऊ नये.. असेही म्हणले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button