क्राईम

घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने,लाथा बुक्क्याने बेदम मारहाण घटनेत प्रियंकाचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर : पतीने घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली.मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रियंका संदीप राऊत असे हत्या झालेल्या विवाहीत महिलेचं नाव आहे. तर संदीप राऊत असं या प्रकरणातील आरोपी पतीचं नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.



 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्यानं आणि लाथा बुक्क्यानं बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियंका राऊत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती संदीप राऊत याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button