व्हिडिओ न्युज

Video राजपूत करणी सेना अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या; लाँरेन्स बिश्नोई गँगने दिली होती धमकी


जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सुखदेव सिंह यांच्या गनरवर देखील गोळ्या झाडल्या.

 

यानंतर, दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे सुखदेव सिंग गोगामेडी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. जयपूर येथील श्याम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

घटना जयपूरच्या श्याम नगर येथे घडली, मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या घरात होते, तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या. यावेळी अनेक राउंड्स फायर करण्यात आले, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

लॉरेंस बिश्नोई गँगमधील संपत नेहरा याने सुखदेव सिंह यांना धमकी दिल्याची माहिती आहे. धमकी मिळाल्यानंतर सुखदेव सिंह यांनी जयपूर पोलिसांकडे एक तक्रार दिली होती, यानंतर सुखदेव सिंह यांची हत्या करण्यात आली आहे.

हल्लेखोर दोन स्कूटरवरून आले होते. त्यांची संख्या चार असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी हे मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास श्याम नगर जनपथवरील त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी मेट्रो मास हॉस्पिटलबाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button