क्राईम

पुणे आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार


लष्करात असलेल्या जवळच्या नातेवाईकाने एका महिलेचा लपून आंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले.

त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Rape Case) ठेवले. हा प्रकार 2016 पासून नोव्हेंबर 2023 मध्ये वडगाव बुद्रुक, नऱ्हे येथील लॉज मध्ये घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपीने महिलेच्या न कळत आंघोळ करतानाचा व्हिडिओ चित्रीत केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने त्यांच्या घरी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत जबरस्तीने शरीर संबंध ठेवले.
या बाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना आणि गावातील लोकांना सगळं सांगून
व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button