राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित – राज्य निवडणूक आयोग

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : राज्यातील निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थिगिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता. मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२ जुलै, २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि. १९/०७/२०२२ रोजी ठेवलेली आहे.

सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-२०२२ याद्वारे स्थगित करण्यात येत आहे.

सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही.
१७ जिल्ह्यांत होणार होत्या निवडणुका
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा

अ वर्गातील ६ नगरपरिषदा
जळगाव जिल्ह्यातील – भुसावळ

पुणे जिल्ह्यातील – बारामती

सोलापूर जिल्ह्यातील – बार्शी

जालना जिल्ह्यातील – जालना

बीड जिल्ह्यातील – बीड

उस्मानाबाद जिल्ह्यातील – उस्मानाबाद

ब वर्गातील २८ नगरपरिषदा
नाशिक जिल्ह्यातील – मनमाड, सिन्नर येवला

नंदूरबार जिल्ह्यातील – शहादा

अहमदनगर जिल्ह्यातील – कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर

धुळे जिल्ह्यातील – दौंडाईचा – वरवाडे, शिरपूर – वरवाडे

सातारा जिल्ह्यातील – कराड, फलटण

सोलापूर जिल्ह्यातील – अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज

पुणे जिल्ह्यातील – चाकण, दौंड

सांगली जिल्ह्यातील – इस्लामपूर, विटा

कोल्हापूर जिल्ह्यातील – जयसिंगपूर

औरंगाबाद जिल्ह्यातील – कन्नड, पैठण

लातूर जिल्ह्यातील – अहमदपूर

बीड जिल्ह्यातील – अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ

अमरावती जिल्ह्यातील – अंजनगाव – सुर्जी