क्राईम

प्रेमासाठी पाकिस्तानात पळून गेलेली अंजू भारतात का परतली?


पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीणा यांच्या अनोख्या प्रेमकथेची चर्चा रंगत होती. तर दुसरीकडे अंजू ही भारतीय महिला पाकिस्तांनी तरुणाच्या प्रेमात पडली.
फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर अंजूने प्रेमासाठी पतीसह मुलांना सोडून थेट पाकिस्तान गाठलं. तिथे गेल्यानंतर तिने नसरुल्ला नावाच्या तरुणासोबत विवाह देखील केला.

इतकंच नाही, तर अंजूने इस्लाम धर्मही स्वीकारला. तसेच तिने आपले नाव बदलून फातिम असे ठेवले. पुढे या गोष्टीची बरीच चर्चा झाली. पण आता तब्बल ६ महिन्यानंतर अंजू पुन्हा भारतात परतली आहे. सध्या बीएसएफच्या कॅंपमध्ये असून विमानाने ती अमृतसरहून दिल्लीला जाणार आहे.

अंजूचा पाकिस्तानी पती तिला वाघा बॉर्डरपर्यंत सोडायला आला होता. दरम्यान, भारतात परतल्यानंतर पोलिसांनी अंजूची कसून चौकशी केली. त्यावेळी अंजूने भारतात येण्याचं कारण सांगितलं. मी थोड्याच दिवसांसाठी भारतात आले असून पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पाकिस्तानात परतणार असल्याचं अंजू म्हणाली.

त्याचबरोबर पाकिस्तानात जाताना मी माझ्या मुलांना देखील सोबत नेणार असल्याचं अंजूने पोलिसांना सांगितलं आहे. राजस्थान येथून थेट पाकिस्तानात गेल्यावर मी इस्लाम स्वीकारला असून पाकिस्तानी तरुण नसरुल्लाह याच्यासोबत विवाह केला आहे. आमचा संसार सुखात सुरू आहे, असंही अंजूने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

दरम्यान, नसरुल्लाह सोबत लग्न केल्याचा कोणताही पुरावा अंजू पोलिसांना देऊ शकली नाही. अंजूचा पती ड्रग्ज डीलर असल्याचा खुलासाही झाला आहे. स्वत:अंजूनेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. अंजू २०१८ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाहच्या संपर्कात आली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button