नववधू आणि नवरदेवानं शेअर केला Video ‘अशी होती लग्नाची पहिली रात्र’…
जोडप्याचा हा एक रोमँटिक व्हिडीओ आहे, जो त्यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे, पण अनेकांना तो आवडलेला नाही ज्यामुळे लोकांनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे.
खरंतर या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. साधारणपणे, लोक असे क्षण वैयक्तिक ठेवतात. पण या जोडप्याने हा सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांना आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीत काय काय केलं हे सगळं कॅमेरात रेकॉर्ड करुन शेअर केलं. शिवाय त्याल कॅप्शन दिलं की, ”लग्नाची पहिली रात्र अशी केली सेलिब्रेट.”
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Toxicity____ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Puri Unboxing post karna tha 🤐 pic.twitter.com/i40KupAEwk
— Berlin (@Toxicity_______) November 27, 2023
लग्न झाल्यानंतर नववधूने रुममध्ये जाऊन तिचे सगळे दागिने काढले, ज्याला फारच वेळ गेला. यामध्ये नवरदेवानं तिला मदत केली. त्यानंतर केस सोडणे हा नववधूसाठी खूप मोठा टास्क होता. कारण लग्नाची हेअर स्टाईल करण्यासाठी खूप सारे हेअर पिन्स वापरले जातात. जे नंतर काढताना नाकी नऊ येतात. हे सगळं करण्यासाठी नवरदेवानं नववधूची मदत केली. शिवाय हे दोघेही व्हिडीओमध्ये रोमान्स करत होते. एकमेकांना किस करत होते. जे अनेक नेटकऱ्यांना आवडलं नाही. हा त्या दोघांचा खूप खासगी वेळ होता. जो त्यांनी असा चार चौघात शेअर केला, जे अनेकांना पटलेलं नाही. ज्यामुळे लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.
तसे पाहाता हा व्हिडीओ तसा जुना आहे, परंतू लग्नाच्या या सिजनमध्ये तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.