क्राईम

ठेला लावण्यावरून वाद,भाजीविक्रेत्याला मारहाण, डोक्याला मार लागून म्रत्यू


नागपूर : केकच्या एका दुकानदाराने भाजीविक्रेत्याला मारहाण केली व त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीतून ठेला लावण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची बाब समोर आली



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभुदयाल भैय्यालाल सराटे (४०, पुनापूर रोड) असे मृतकाचे नाव आहे. तो किरायाने राहत होता व त्याच्या घराजवळच भाजीचा ठेला लावायचा. तो जेथे ठेला लावायचा त्याच्या मागे काही दुकाने आहेत. त्यात आरोपी गजानन वाडणकर याचे केकचेदेखील दुकान होते. प्रभुदयालच्या ठेला लावण्यावर दुकानदाराला हरकत होती. मात्र त्यांच्यात याअगोदर कधीही वाद झाला नव्हता.

मंगळवारी त्यांच्यात वाद झाला व गजाननने प्रभुदयालला शिवीगाळ केले. त्यावर त्यानेदेखील प्रत्युत्तर दिले. त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले व गजाननने लाकडी दांड्यासारख्या वस्तूने सराटेच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यात सराटे गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील लोकांनी या प्रकाराची पारडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button