व्हिडिओ न्युज

Video पुणे विषारी अन् स्फोटक गॅस टँकर पलटला


पुणे : पुणे-अहमदनगर रस्त्यावर मोठी दुर्घटना घडली. या महामार्गावर वडगाव शेरी चौकाजवळ एक गॅस टँकर पलटला. त्यात एथिलीन ऑक्साइड होते. एथिलीन ऑक्साइड विषारी आणि स्फोटक असल्यामुळे धावपळ उडाली.

अपघाताची महिती मिळताच पुणे महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी पाठवण्यात आली. तसेच रिलायंस पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात आले. धोका लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक थांबवली. टँकरमधील रसायनामुळे टँकर चालकास श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोक्याची शक्यता

पुणे-अहमदनगर महामार्गावर वडगाव शेरी चौकात गॅस टँकर पलटला. या टँकरमधून एथिलीन ऑक्साइडची वाहतूक सुरु होती. यामुळे आप्तकालीन परिस्थिती निर्माण झाली. एथिलीन ऑक्साइड विषारी आणि स्फोटक गॅस आहे. हा गॅस लीक झाला तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अग्नीशमन दलाने धोका लक्षात घेऊन जवळपासच्या परिसरातील फायर टेंडर नियुक्त केले.

कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल

अपघात झालेला टँकरमधून रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या गॅसची वाहतूक होत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अपघातासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. कंपनीची गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत टँकरवर पाणी मारले जात आहे. राज्य शासनाची केमिकल इमरजन्सी टीमसुद्धा घटनास्थळी पोहचत आहे. तसेच रिलायन्स कंपनीची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून वाहतूक रोखली होती. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button