व्हिडिओ न्युज

Video झपाटलेला बाहुला,व्हिडीओ पाहून प्रत्येकाला घाम फुटेल


भूत रिअलमध्ये असं काही नसतं, असं अनेकांना वाटतं. पण काही लोक बाहुल्यातही भूत असल्याचा दावा करतात.

अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान आता तर याचा व्हिडीओच समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला घाम फुटला आहे.

दुसऱ्या महायुद्धातील ही बाहुली आहे. जी आता एका घरात आहे. यूकेच्या लिव्हरपूल येथील रहिवासी मायकेल डायमंडचं हे घर. या घरात ही बाहुली आता कुटुंबापासून दूर एका खोलीत बंद आहे. साखळदंडांनी तिला बांधलं आहे. ही बाहुली असं काही करताना दिसली की कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे. ज्यामुळे प्रत्येक जण घाबरला आहे.

मिस्टर फ्रिट्झ असं या बाहुलीचं नाव. ही बाहुली त्याला दुसऱ्या महायुद्धाच्या छावणीतील एका माजी कैद्याने मायकलला दिली होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मायकलने ही बाहुली घरी आणली तेव्हा त्याला विचित्र घटना घडताना दिसल्या. ही बाहुली ‘भूत’ आहे, असा दावा त्याने केला आहे.

मायकेलच्या लक्षात आलं की बाहुलीचं काचेचे डिस्प्ले कॅबिनेट रात्री रहस्यमयपणे उघडेल. असं अनेकवेळा घडल्यानं त्याला आश्चर्य वाटलं. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी त्यानं बाहुलीच्या काचेच्या डिस्प्ले कॅबिनेटसमोर कॅमेरा ठेवला. जे कॅमेऱ्यात कैद झालं ते पाहून पायाखालची जमीनच सरकली. फुटेजमध्ये त्याला बाहुलीच्या कॅबिनेटचा दरवाजा आपोआप उघडताना दिसला. काही वेळाने बाहुलीचे डोळे आणि तोंड हलताना दिसलं.

भीती वाटणे ही फक्त भावना नाही तर यामागे आहे सायन्स तुम्हाला ते माहितीय का?
मायकेलच्या म्हणण्यानुसार, ‘ जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला खूप विचित्र वाटले. मी वर्णन करू शकत नाही असा अनुभव होता. मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो नसलो तरीही मी तो व्हिडिओ अनेक वेळा पाहिला. बाहुलीच्या काचेच्या कॅबिनेटचा दरवाजा हलत होता. मी असे म्हणणार नाही की मला बाहुल्यांची भीती वाटते, परंतु मी त्यांच्यापासून सावध आहे.

घटनेनंतर मायकल डायमंडच्या कुटुंबाने या बाहुलीपासून स्वतःला दूर केलं. आता, बाहुली एका कपाटात बंद केली आहे, साखळी आणि कुलूपांनी बांधली आहे आणि ब्लँकेटने झाकलेली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button