व्हिडिओ न्युज

पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..


लग्न प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण एका जोडप्याने लग्नाची गाठ चक्क प्रायव्हेट जेट (Private Jet) म्हणजेच विमानात बांधली आहे.

ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकाने आपल्या मुलीचं लग्न धरतीतलावर नसून आकाशात लावले आहे (Social Viral News). ते प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक नक्की आहेत तरी कोण? या लग्नाची सोशल मीडियात एवढी चर्चा का होत आहे?

दिवाळी सरली की अनेकांना लग्नाचे वेध लागते. तुळशीचं लग्न पार पडलं की अनेकांच्या घरात सनईचे सूर ऐकू येतात. पण एका जोडप्याने आपल्या लग्नातील सनईचे सूर प्रायव्हेट जेटमध्ये वाजवले आहे, आणि या लग्नाची चर्चा सोशल मीडियात खूपच रंगली आहे. यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती दिलीप पोपले यांनी आपल्या मुलीचा विवाह चक्क विमानात लावून दिले आहे. हा अनोखा विवाह सोहळा २४ नोव्हेंबर रोजी ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यात पोपले यांचे मित्र आणि नातेवाईक यांचा समावेश होता.

या लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांसह सर्वांनी दुबई ते ओमान असा तीन तासांचा प्रवास केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिलीप पोपले दुबईत राहतात. आपल्या मुलीचा विवाह हटके करण्याचे त्यांचे स्वप्न होते. १९९४ मध्ये पोपले यांचं लग्नही एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये पार पडलं होतं.

 

व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाची आतील बाजू दिसत आहे. शिवाय विमान आतून एका मंडपाप्रमाणे सजवण्यात आले आहे. सुरुवातीला मंडळी हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसून येत आहे. नंतर त्याच विमानात या जोडप्याने सात फेरे घेतले. व्हिडीओच्या शेवटी दिलीप यांची मुलगी अन् जावई हे सर्वांचे आभार मानतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button