व्हिडिओ न्युज

डबल डेकर सायकलवर आजोबांचे हेवी ड्रायव्हिंग, video पहाच!


जगात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर माणूस चक्क डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहेत.



आजोबांचा अनोखा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही डबल डेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात आली, असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडलाय. सामान्य सायकलपेक्षा ही सायकल उंच असूनही आजोबा अगदी सहजतेने सायकल चालवताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, तरीसुद्धा आजोबांचा हा जुगाड अनेकांच्या पसंतीस देखील उतरला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button